माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना राज्य शासनाचा दिलासा; आरोप आणि निलंबन मागे
मुंबई दि.१२ :- बृहन्मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्य शासनाने त्यांच्यावरील सर्व आरोप आणि त्यांचे निलंबनही मागे घेतले आहे.
दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील राष्ट्रीय उद्यान, दिंडोशी येथील पादचारी पूल सुरू
विविध भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये परमवीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परमवीर सिंह यांचे निलंबन ‘कॅट’ने रद्द केले. सिंह यांच्यावरील विभागीय चौकशी बेकायदेशीर ठरविली. कॅटनेच त्यांच्यावरील निलंबन रद्द केले आहे.
‘मनसे’ अध्यक्ष आजपासून ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या दौ-यावर
राज्य शासनाने केवळ ‘कॅट’च्या निर्णयाची अंमलबजावणी केली आणि त्यांचे निलंबन मागे घेतले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनींशी बोलताना दिली.