दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवरील राष्ट्रीय उद्यान, दिंडोशी येथील पादचारी पूल सुरू
पश्चिम द्रुतगती मार्गावरून मेट्रो स्थानकात जाणे अधिक सोपे
मुंबई दि.१२ :- पश्चिम द्रुतगती मार्गावरून मेट्रो स्थानकावर पोहोचता यावे यासाठी राष्ट्रीय उद्यान आणि दिंडोशी येथे उभारण्यात आलेले पादचारी पूल सुरू झाले आहेत.
‘मनसे’ अध्यक्ष आजपासून ठाणे, पालघर जिल्ह्यांच्या दौ-यावर
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दहिसर – गुंदवली मेट्रो ७ मार्गिकेवर नऊ पादचारी पुलांच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. यापैकी उपरोक्त दोन पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी या दोन्ही पुलाचे उदघाटन करण्यात आले.
मुंबईकर आणि ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार
राष्ट्रीय उद्यान पादचारीपूल ८३ मीटर लांब, तर चार मीटर रुंद आहे. तर दिंडोशी पादचारीपूल ११२ मीटर लांब आणि चार मीटर रुंद आहे. राष्ट्रीय उद्यान पुलामुळे द्रुतगती मार्गावरून राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकावर पोहोचणे सोपे होणार आहे, तर दिंडोशी पुलामुळे द्रुतगती मार्गावरून दिंडोशी मेट्रो स्थानकावर पोहोचणे सोपे होणार आहे.