* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण; मोठी खासगी गुंतवणूक – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण; मोठी खासगी गुंतवणूक

मुंबई दि.१० :- सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत गाठण्याचे उद्दीष्ट आहे.

अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण

या संदर्भातील विकासकाची निवड सामजंस्य कराराद्धारे सरळ वाटप किंवा स्पर्धात्मक निविदा प्रक्रीयेतून करण्यात येणार आहे. फलटण ते पंढरपूर प्रकल्प रेल्वे विभागातर्फे राबविणार फलटण ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीने (महारेल) १८४२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. यामध्ये राज्य शासनाचा सहभाग ९२१ कोटी इतका असून हा निधी टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

रसायनाची पिंपे असलेला टँकर कलंडला

हा प्रकल्प महारेल ऐवजी रेल्वे विभागातर्फे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन नाशिक येथेील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *