राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.१६ :- राज्यातील महापालिका रखडलेल्या निवडणुका येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे महिन्यामध्ये घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.
१ लाख ६५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी पाणीपट्टी थकविली
मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका प्रभाग रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या.