शंकराच्या पिंडीवर हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

मुंबई दि.१६ :- स्थानिक ऊरुसाच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत काही मुसलमानांनी नाशिक येथे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच शंकराच्या पिंडीवर हिरवी शाल चढवायची आहे, असा आग्रह धरला. मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी या मुसलमानांना अडविल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांनी केली.

१ लाख ६५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी पाणीपट्टी थकविली

या संदर्भातील निवेदन नाशिक पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. हे निवेदन नाशिकच्या ग्रामीण साहाय्यक पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांनी स्वीकारले. हे निवेदन ई-मेलद्वारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनाही पाठविण्यात आले. भारतीय राज्यघटनेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मीयांनाच देण्यात आले आहेत. तरी अहिंदूंनी अशी कृती करणे म्हणजे सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न आहे, असे घनवट म्हणाले.

बेपत्ता महिलांच्या तपासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शोधमोहीम राबवावी- रुपाली चाकणकर

गेल्या काही दिवसांपासून अमरावती, संभाजीनगर, अकोला येथे घडलेल्या घटना पहाता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संदर्भात झालेली घटना ही जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवणारी आहे. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे मोठे षडयंत्र असू शकते, असे पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.