मुंबईतील अतिधोकादायक २१६ इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करणार – महापालिका आयुक्तांचे आदेश
मुंबई दि.१९ :- मुंबईत एकूण २१६ इमारती अतिधोकादायक स्थितीत असून या इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
सी १’ श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची सूचना आयुक्तांनी यावेळी केली. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांवर घर रिकामे करण्याची नोटीस बजाविण्याची, तसेच त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.