ठळक बातम्या

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई दि.१७ :- सह्याद्री अतिथीगृह येथे आज आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय विभागासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी महामंडळाचा स्टाॅल

राज्य शासनाकडून ज्येष्ठांसाठी एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. या सवलतींचा लाभ ज्येष्ठांनी घ्यावा. ज्येष्ठांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विविध पोलीस स्थानकात ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. हे कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत होण्यासाठी पोलीस विभागाने सर्व स्थानकांना सूचना द्याव्यात, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तसेच ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.बैठकीत सावंत आणि भुसे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *