वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच बैठक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.०३ :- महाराष्ट्रातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा :- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या ( संलग्न भारतीय मजदूर संघ) शिष्टमंडळाने मंत्रालयात नुकतीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.‌ त्यावेळी फडणवीस यांनी उपरोक्त आश्वासन दिले. या शिष्टमंडळात माजी आमदार आणि राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई, संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे महामंत्री अरूण पिवळ, उपमहामंत्री प्रशांत भांबुर्डेकर यांचा समावेश होता.‌

हेही वाचा :- केंद्रीय राखीव पोलीस दलात महिला अधिकारी महानिरीक्षक

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदनही देण्यात आले. देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना कायम करावे आणि याची सुरुवात वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांपासून केली जावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.