अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.१६ :- महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुख्य सचिव मनोज सौनिक यावेळी उपस्थित होते. भारत – अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
भगतसिंह कोश्यारी आणि राज्यपाल रमेश बैस सदिच्छा भेट
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये जी २० देशांच्या बैठका सुरू आहेत. त्यासाठी मुंबई महानगरी सजली असून सुमारे एक हजारांहून अधिक ठिकाणी सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. शिष्टमंडळासाठी देण्यात आलेल्या अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी अमेरिकन राजदूत गारसेट्टी यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. मुख्यमंत्र्यांनी केलेला आग्रह स्वीकारत गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि तो आवडल्याची प्रतिक्रीयाही व्यक्त केली.