ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करणार
ठाणे दि.१७ :- ठाणे जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.
बाळासाहेब आपला दवाखाना’ वर्षपूर्तीच्या निमित्ताने जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे आदी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या केंद्रांचे उदघाटन होणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या ७३ आश्रम शाळा स्मार्ट होणार
ठाणे जिल्ह्यात भिवंडी तालुक्यातील कोन, अंबाडी, कल्याण तालुक्यातील गोवेली व कांबा, मुरबाड तालुक्यातील सरळगाव, म्हसा, शहापूर तालुक्यातील मोखावणे व वाशिंद आणि अंबरनाथ तालुक्यातील वांगणी या ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे स्थापन होणार आहेत.