अत्याधुनिक क्राऊलर कॅमे-याद्वारे जलवाहिनीतील गळती, दूषित स्रोताचा शोध

कमी वेळेत जलवाहिनीची दुरूस्ती शक्य

मुंबई दि.२९ :- जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. अशा वेळी सीसीटीव्हीसारखी पद्धती असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा कॅमेरा वापरात येणार आहे.

तीनही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडिओ मिळवणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य होते. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे.

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

कॅमेऱ्याला चार चाकांमुळे २०० मीटरपर्यंतचे अंतर पार करणे शक्य आहे. या कॅमेऱ्याचे संचलन दूरसंवेदक (रिमोट)ने करणे शक्य आहे. त्यासोबतच जलवाहिनीच्या आतील बाजुची दृश्ये टिपणे, रेकॉर्ड करण्यासाठी प्रखर दिव्यांची प्रकाशयोजनाही कॅमेऱ्याला करण्यात आली आहे.
जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी माणूस उतरून काम करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर खुपच सोयीचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.