मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.०१ :- देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून द्याव्यात , असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले.

ई शिवनेरी बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा आढावा घेणारा पाहणी दौरा मुख्यमंत्री शिंदे यांनी आज केला. त्यावेळी ते बोलत होते. या परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची तसेच उपाययोजनांची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबालसिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा निवडताना भविष्यातील संधींचा विचार करावा – गिरीश टिळक

मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महापालिकेतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती देताना आयुक्त चहल म्हणाले मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे.

लोकमान्य गुरुकुलचा आगळावेगळा वर्षांत समारंभ

व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल, असेही चहल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.