ठळक बातम्या

ई शिवनेरी बसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

अभिनेते मकरंद अनासपुरे एसटीचे सदिच्छा दूत

मुंबई दि.०१ :- ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे उदघाटन करण्यात आले. सध्या मुंबई–ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात करण्यात झाली.

विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा निवडताना भविष्यातील संधींचा विचार करावा – गिरीश टिळक

अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली. एसटी अजूनही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीची सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी. एसटीची सर्व बसस्थानके, स्वच्छतागृहे, बसस्थानक परिसर व प्रवासी बसेस या स्वच्छ व टापटिप असाव्यात यासाठी स्पर्धात्मक स्वरुपात अभियान राबवून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

लोकमान्य गुरुकुलचा आगळावेगळा वर्षांत समारंभ

व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *