ठळक बातम्या

‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कार्य प्रेरणादायक – रा.स्व. संघाचे भय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

डोंबिवली दि.१२ :- ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त या व्यक्तिंनी स्वतःच्या भौतिक गरजापेक्षा सन्मानाचा स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न केला. या सर्वांचे काम प्रेरणादायक आणि विचारांना दिशा देणारे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी यांनी येथे केले. अभ्युदय प्रतिष्ठानतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त रा. स्व. संघ स्वयंसेवकांचा गौरव सोहळा टिळकनगर शाळेच्या प्रांगणात सोमवारी आयोजित करण्यात आला होता.

भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी हिरण्यमय पंड्या

त्यावेळी जोशी बोलत होते. गिरीश प्रभूणे, रमेश पतंगे, भिकूजी (दादा) इदाते, गजानन माने यांचा जोशी यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. या मंडळींचे काम समजून घेऊन त्या मार्गावर आपणही चालले पाहिजे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन ते कृतीत आणण्याची गरज आहे, असेही जोशी यांनी सांगितले. आपण रा.स्व. संघाच्या संस्कारातून आलो आहोत. आपली संघाच्या विचारांशी बांधिलकी आहे आणि संघाशी बांधिलकी याचाच अर्थ ती सामाजिक बांधिलकी आहे. ही बांधिलकी कर्मप्रमण करणारी असली पाहिजे. निराशा करणारी असू नये, असेही जोशी म्हणाले.

डोंबिवलीकर ‘नांदी’रंगात आणि नाट्यसंगीतात रंगले!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्युदय प्रतिष्ठान डोंबिवलीचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी केले. रा.स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे आणि अन्य मान्यवर, रा.स्व. संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते. टिळकनगर शिक्षण मंडळ, कल्याण जनता सहकारी बॅक, जनकल्याण समिती, अखिल भारतीय साहित्य परिषद, गणोश मंदिर संस्थान, उज्वल चॅरिटेबल ट्रस्ट यां संस्थांच्या प्रतिनिधींही ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त या मान्यवरांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *