ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल
मुंबई दि.१२ :- पश्चिम रेल्वेवर आज सकाळी दहाच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्याने गाड्या एकाच जागी खोळंबल्याने नोकरदार प्रवाशांचे हाल झाले. दहिसर-बोरिवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप जलद मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने वातानुकूलित लोकलसह तीन लोकल खोळंबल्या.
वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे रेल्वे सेवा कोलमडली. बोरीवली ते चर्चगेट मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेक प्रवाशांनी खाली उतरुन रेल्वे रुळातून मार्गक्रमण करणे पसंत केले.