भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी हिरण्यमय पंड्या
मुंबई, दि. ११
भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी हिरण्यमय पंड्या यांची निवड करण्यात आली आहे. पाटणा येथे झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या २० व्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली.
२०२३ ते २०२६ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीही निवड करण्यात आली. एस मलेशम, एम पी सिंह, के पी सिंह, नीता चौबे, सुखमिंदर सिंह डिक्की, एम जगदीश्वर राव, राज बिहारी शर्मा ( सर्व उपाध्यक्ष).बी सुरेंद्रन हे राष्ट्रीय संघटनमंत्री तर गणेश मिश्रा सहसंघटन मंत्री असतील.
यांच्यासह रवींद्र हिमते, सुरेंद्र कुमार पांडेय (महामंत्री), गिरिश चंद्र आर्या, राम नाथ गणेशे, अशोक कुमार शुक्ला, वी राधाकृष्णन, अंजली पटेल, नाबा कुमार गोगोई, राधे श्याम जायसवा, श्रवण कुमार राठोड, अनीश मिश्रा यांचीही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून वसंत पिंपळापुरे यांनी काम पाहिले.
सर्व राज्यातील महामंत्री आणि अखिल भारतीय महासंघाचे महामंत्री कार्यकारिणी सदस्य असतील, अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे महामंत्री सचिन मेंगाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
——