समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे २६ मे रोजी उदघाटन
मुंबई दि.२३ :- समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन येत्या २६ मे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावरील पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी असा असून या मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले होते.
मुंबई – पुणे या मार्गावर जून महिन्याच्या अखेरपर्यंत १०० ईलेक्ट्रिक बसेस धावणार
शिर्डी ते भरवीर पर्यंततचा हा दुसरा टप्पा ८० किलोमीटरचा आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी ७१० किलोमीटर असून सध्या नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते भरवीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास सात तासात पूर्ण करता येणार आहे.