कविता आणि काव्यविषयक साहित्याला वाहिलेल्या द.भा.धामणस्कर वाचनालयाचे डोंबिवलीत उदघाटन
महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातील पहिलेच वाचनालय
डोंबिवली दि.२४ :- पै ‘फ्रेंड्स लायब्ररी’च्या डोंबिवली पूर्व शाखेत ‘कविता व काव्यविषयक साहित्याला’ वाहिलेल्या ‘द. भा.धामणस्कर वाचनालयाचे उद्घाटन रविवारी कवीवर्य किरण येले यांच्या हस्ते झाले. कवीवर्य द.भा. धामणस्कर हे कार्यक्रमास उपस्थित नव्हते. त्यांच्या मनोगताची ध्वनीचित्रफित दाखविण्यात आली. कविता व काव्यविषयक साहित्याला वाहिलेले हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील पहिले वाचनालय आहे. वाचनालयाची संकल्पना काव्यरसिक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.प्रल्हाद देशपांडे यांची असून या कार्यक्रमास कवीवर्य द. भा. धामणस्कर यांचे सुपुत्र अजित उपस्थित होते.
एस.टी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटींची रक्कम प्रलंबित
मंडळाकडे उपलब्ध असणाऱ्या कवितांच्या पुस्तकांना पै फ्रेंड्स लायब्ररीत छोटा विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. काव्यरसिक मंडळातर्फे दरवर्षी काव्य पुरस्कार जाहीर केले जातात. त्यावेळी स्पर्धेसाठी आलेले काव्यसंग्रह, मंडळातील सदस्यांचे प्रकाशित साहित्य व इतर अनेक पुस्तके मंडळाकडे बरेच वर्षे जमली होती ती वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने काव् रसिक मंडळाने पुस्तकांचा हा सर्व संग्रह पै फ्रेंड्स लायब्ररीचे सर्वेसर्वा पुंडलिक पै यांच्याकडे सुपूर्द केला.
या वेळी मनोगत व्यक्त करताना कविवर्य येले म्हणाले, कवी एका दिवसांत घडत नाही. त्याची मानसिकता, संवेदनशीलता घडविणारे अनेक प्रसंग येऊन गेलेले असतात. इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही, त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते. येले यांनी द. भा. धामणस्कर यांच्या काही कविता सादर केल्या. काव्यरसिक मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष वैदेही जोशी यांनी या वाचनालयाची थोडक्यात माहिती सांगितली.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत नाट्य महोत्सव
कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षा अध्यक्षा वैदेही जोशी, सदस्य प्रवीण दामले, मृणाल केळकर, स्वाती भाटये, अजित महाडकर यांनीही काही कविता सादर केल्या. मंडळाचे सल्लागार जयंत कुळकर्णी यांनी पुस्तके व वाचनालय विषयक काही इंग्रजी लेखकांची, लेखनाची उदाहरणे तर काही उर्दू शेर ऐकविले. मंडळाचे सदस्य महेश देशपांडे यांनी कविवर्य किरण येले यांचा थोडक्यात परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना पाटील, सानिका गोडसे यांनी केले. सम्राज्ञी उटगीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले रसिक काव्यप्रेमींना एक महिन्यानंतर द भा धामणस्कर वाचनालय, ‘पै फ्रेंड्स लायब्ररी, डोंबिवली पूर्व येथे कवितांचा पुस्तकांचा लाभ घेता येणार आहे.