दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत नाट्य महोत्सव

मुंबई दि.२४ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे २८ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत संगीत नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले (वातानुकूलित) सभागृहात दररोज संध्याकाळी साडेपाच वाजता संगीत नाटक सादर होणार आहे. गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत शारदा हे संगीत नाटक शुक्रवार २८ एप्रिल २०२३ रोजी सादर होईल.

पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित ‘पुस्तक रस्ता’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद

पुणे येथील भरत नाट्य संशोधन मंदिर ही नाट्यसंस्था त्याचे सादरीकरण करणार आहे. शनिवार २९ एप्रिल २०२३ रोजी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित आणि संगीत दिग्दर्शक कै. भास्करबुवा बखले यांचे संगीत स्वयंवर हे संगीत नाटक पुणे येथील कलाद्वयी ही संस्था सादर करणार आहे.

घरात शिरलेल्या चोराकडून वृद्ध महिलेची हत्या

रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी विद्याधर गोखले लिखित संगीत मदनाची मंजिरी हे नाटक पुणे येथील कलाद्वयी संस्थेचे कलाकार सादर करणार असून त्याचे संगीत दिग्दर्शन प्रभाकर भालेकर आणि संगीतभूषण पं. राम मराठे यांनी केले आहे. नाट्य व संगीतप्रेमी रसिकांनी नाट्य महोत्सवातील संगीत नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.