एस.टी. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटींची रक्कम प्रलंबित

मुंबई दि.२४ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी, उपदानाची ८०० कोटी रुपये रक्कम अद्याप प्रलंबित आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील ४ वर्षांपर्यंत महामंडळ कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे राज्य सरकारने संपकाळात प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सांगितले होते.

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत नाट्य महोत्सव

मात्र, गेले ११ महिने राज्य सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) व उपदानाची ८०० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. एसटी महामंडळाच्या दरमहा उत्पन्नातून वेतनासह इतर खर्च भागविण्यासाठी दर महिना जेवढ्या रकमेची तूट निर्माण होत आहे.

‘बोल हरी बोल’चित्रपटाचा प्रिमियर २८ एप्रिलला ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर

तेवढी रक्कम महामंडळाला राज्य सरकारकडून अर्थसहाय्य म्हणून देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते.  मात्र, गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची तूट आहे. एसटी महामंडळाने ही बाब राज्य सरकारला कळविली असून ही तफावत रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही, असे कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.