‘बोल हरी बोल’चित्रपटाचा प्रिमियर २८ एप्रिलला ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर
मुंबई दि.२३ :- मराठी बिगबॉस विजेता अभिनेता अक्षय केळकर, अभिनेते रमेश वाणी, अभिनेत्री आकांक्षा साखरकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर पहायला मिळणार आहे. निर्माते सुशीलकुमार अग्रवाल यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे.
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे संगीत नाट्य महोत्सव
स्वतःच्या सुखवस्तू जीवनाची स्वप्न पाहताना, वडिलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरी पोंक्षेच्या जीवनावर चित्रपटाची कथा आधारीत आहे. हरीचे वडील, मनोहर पोंक्षे हे सरकारी कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून, ते एका चाळीत राहतात.
पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित ‘पुस्तक रस्ता’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद
मुंबईत स्वत:ची सदनिका घेण्याचे त्याचे स्वप्न आहे आणि हरीने त्याचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी त्याची इच्छा आहे. स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच एकमेकांच्या स्वभावासोबत जुळवून घेण्यासाठीची त्यांची धडपड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचे कार्यक्रम उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, वेब-शो उपलब्ध आहेत.