* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे, वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे, वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री

मुंबई दि.१६ :- दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत घरे आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मुंबईत १ ते १३ नोव्हेंबर या काळात ५,१४३ घरांची विक्री झाली. यातून मुद्रांक शुल्कापोटी सरकारला तब्बल ३७५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मुंबई शहरातील चार आरटीओमध्ये चार हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली.

मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग; माथेरानच्या डोंगराखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याचे बांधकाम सुरू

गेल्या दीड महिन्यात राज्यभरात ८२३ नव्या गृहप्रकल्पांना सुरुवात झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ८,९६५ घरांची विक्री झाली होती. १ ते १३ नोव्हेंबरदरम्यान ‘महारेरा’कडे ४१४ नवीन प्रकल्पाच्या नोंदणीसाठी अर्ज आले यापैकी १७८ प्रकल्पांना ‘महारेरा’ नोंदणी क्रमांक मिळाला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आचार संहितेत बदल केला आहे का? – उद्धव बाळासाहेब ठाकरे

दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत चार आरटीओ विभागांत १० ते १५ नोव्हेंबरदम्यान ४,०१४ वाहनांची नोंदणी आणि खरेदी झाली. गेल्यावर्षीच्या दिवाळीच्या काळात २,९५८ वाहनांची खरेदी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *