पै फ्रेंड्स लायब्ररी आयोजित ‘पुस्तक रस्ता’ उपक्रमास भरघोस प्रतिसाद
डोंबिवली दि.२३ :- पुस्तकाचा प्रचार आणि प्रसार याबरोबरच वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी पै फ्रेंड्स लायब्ररी विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त आज पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ‘पुस्तक रस्ता’ उपक्रमातचे आयोजन करण्यात आले होते. हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिला उपक्रम असल्याचे पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक संचालक पुंडलिक पै यांनी सांगितले.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
डोंबिवली पूर्व फडके रस्ता येथे आप्पा दातार चौका ते मॉडर्न कॅफे चौकापर्यंत रस्त्यावर लाल गालिचा अंथरून विविध विषयांवरील हजारो पुस्तके मांडण्यात आली होती. मांडण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये कथा कादंबरी, ऐतिहासिक, अनुवादीत, विज्ञानविषयक पुस्तकांसह लहान मुलांच्या इंग्रजी व मराठी गोष्टींच्या पुस्तकांचा समावेश होता.
घरात शिरलेल्या चोराकडून वृद्ध महिलेची हत्या
पहाटे पाच वाजता या उपक्रमास सुरुवात झाली. अगदी सकाळीही पुस्तकप्रेमी डोंबिवलीकरांनी हजेरी लावली होती. सात वाजल्यानंतर वाचकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पुस्तक रस्ता उपक्रमांत मांडण्यात आलेली पुस्तके पाहण्यासाठीची रांग कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आचार्य अत्रे ग्रंथालयापर्यंत पोहोचली होती. एका ठराविक संख्येत कूपन देऊन वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी आत सोडण्यात येत होते. येथे फिरून, पुस्तके पाहून बाहेर पडताना मांडण्यात आलेल्या पुस्तकांमधील एक पुस्तक मोफत घेऊन जाता येत होते.
महापालिका शाळांमधील गाईड पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात द्वितीय क्रमांक
दहा वाजता उपक्रमाची सांगता झाली. पहाटे पाच ते दहा या वेळेत सहा हजार वाचक, पुस्तकप्रेमी यांनी येथे भेट दिली. डोंबिवलीतील विविध संघटनांचे २०० हून अधिक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी झाले होते. कल्याण डोंबिवली महापालिका, वाहतूक पोलीस आणि पोलिसांचे विशेष सहकार्य या उपक्रमासाठी लाभले.