घरात शिरलेल्या चोराकडून वृद्ध महिलेची हत्या

मुंबई दि.२२ :- घरात शिरलेल्या चोराकडून वृद्ध महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड येथे घडला. मारी सिलीन विल्फ्रेड डिकोस्टा (६९) असे मृत महिलेचे नाव आहे. पाण्याने भरलेल्या बादलीत तोंड बुडवून या महिलेची हत्या करण्यात आली. महिलेच्या घरात काम करणारी मोलकरीण व तिच्या मुलाने आरोपी चोरासोबत कट रचून हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. मालाड पोलिसांनी तिघांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मालाड पश्चिम येथील न्यू लाईफ सोसायटीत पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक ८ मध्ये मृत महिला वास्तव्यास होती. मृत महिलेचा नातू नील गोपाल रायबो (२६) कामानिमित्त डिकोस्टा यांना दूरध्वनी करीत होता. पण प्रतिसाद न मिळाल्याने नीलने शेजाऱ्यांना दूरध्वनी करून घरी जाण्यास सांगितले.

महापालिका शाळांमधील गाईड पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात द्वितीय क्रमांक

शेजाऱ्यांकडे असलेल्या चावीच्या साहाय्याने त्यांनी घर उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी शौचालयातील पाण्याने भरलेल्या बादलीत डिकोस्टा यांचे तोंड बुडालेले आढळले. शेजाऱ्यांनी घडलेला प्रकार नीलला सांगून डिकोस्टा यांना ताबडतोब कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून डिकोस्टा यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. घरातील दागिने व भ्रमणध्वनी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.