मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक
मुंबई दि.२२ :- देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवारी) रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून धिम्या मार्गावरून सुटणाऱ्या लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तर मुलुंड स्थानकापुढे या लोकल पुन्हा धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.
प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे येथून अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. हार्बर रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११. १० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.
महापालिका शाळांमधील गाईड पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात द्वितीय क्रमांक
या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लोकल, वांद्रे आणि गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पनवेल, बेलापूर, वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा लोकल चालविण्यात येणार आहेत.