‘मोका’ चक्रीवादळामुळे राज्यातही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट
मुंबई दि.०८ :- बंगालच्या उपसागरातील ‘मोका’ चक्रीवादळामुळे राज्यातही वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या वादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना येत्या ११ मेपर्यंत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नितीश कुमार मुंबई दौ-यावर; शरद पवार, उद्धव ठाकरे यांची भेट घेणार
मुंबईतही वातावरणात सातत्याने बदल होत असून पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी आद्रतेमुळे उकाडा कायम आहे.
अभिनेते मोहन जोशी जोशी, दिग्दर्शक कुमार सोहनी सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्काराने सन्मानित
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली.