भारत विकास परिषदेच्या डोंबिवली शाखेतर्फे ‘करिअर मार्गदर्शन’ विषयावर गिरीश टिळक यांचे व्याख्यान

डोंबिवली दि.२८ :- भारत विकास परिषद या सामाजिक संस्थेच्या डोंबिवली शाखेतर्फे येत्या २९ एप्रिल रोजी दहावी, बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन विषयावर गिरीश टिळक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.‌ हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली पूर्व येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या विनायक सभागृहात होणार आहे.‌

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा रविवारी शंभरावा भाग

कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश आहे. डोंबिवली शाखेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त या वर्षभरात किमान २५ कार्यक्रम/ उपक्रम/ प्रकल्प आयोजित केले जाणार आहेत. ‘ज्ञानसंध्या – कृतीसंध्या’ हा याच उपक्रमाचा भाग आहे.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदींमध्ये पूर्वी नमूद केलेले नाव,लिंग बदलण्याची परवानगी

दर महिन्यातून एकदा हा कार्यक्रम होणार असून विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत विकास परिषदेच्या अध्यक्षा ॲड.वृंदा कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.