तिकीट तपासणीतून मध्य रेल्वेला १९३ कोटींहून अधिक रुपयांचा महसूल
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.११ :- एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेने तिकीट तपासणीतून १९३. ६२कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे.
विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणी केली जाते.
एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान, विनातिकीट प्रवास आणि नोंदणी न केलेल्या सामानाची एकूण २९ .०३ लाख प्रकरणे आढळून आली. विनातिकीट प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत १९३.६२ कोटी आहे. सात तिकीट तपासणी कर्मचार्यांनी प्रत्येकी ९० लाखांपेक्षा जास्त वसूली केली आहे.