येत्या शुक्रवारी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण भारतात दिसणार
मुंबई दि.०२ :- येत्या शुक्रवारी ५ मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून जाणार असल्याने होणारे छायाकल्प ( मांद्य ) चंद्रग्रहण होणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याची माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
५ मे रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणा-या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल, रात्री १० वाजून ५३ मिनिटांनी तो जास्तीत जास्त विरळ छायेत ( ग्रहण मध्य ) येईल, उत्तररात्री १ वाजून २ मिनिटांनी चंद्र विरळ छायेतून बाहेर पडेल, असे सोमण यांनी सांगितले.
‘ द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
छायाकल्प चंद्रग्रहणात पौर्णिमेचे तेजस्वी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेत आल्याने कमी तेजस्वी दिसते. या प्रकारच्या चंद्रग्रहणात ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम पाळायचे नसतात. हे छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण आशिया, आफ्रिका, ॲास्ट्रेलिया येथून दिसणार असल्याचेही सोमण म्हणाले.