अपंग आणि पालात राहणाऱ्यांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.१३ :- ग्रामीण भागातील अपंग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयारची सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी काल केली.
मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर
‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
चिखलदरा येथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक उभारण्यात येत आहे. या कामाला गती मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी संवाद साधला आणि या कामाला वन विभागाकडून आवश्यक ते सहकार्य मिळावे, अशी मागणी केली.