मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार- मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि.१३ :-  मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, भाषेचा शिक्षणात, शासकीय कामकाजात अधिकाधिक वापर व्हावा यासाठी मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मराठी भाषा धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी भाषा सल्लागार समितीची बैठक काल मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मेट्रो २ अ च्या मार्गावरील तीन स्थानकांची नावे बदलली

मराठी भाषा धोरण तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीने काही सूचना शासनासमोर सादर केल्या आहेत. या सूचनांवर सकारात्मक विचार करण्यात येऊन ज्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करणे शक्य आहे असे निर्णय तात्काळ घेतले जातील, असेही केसरकर यांनी सांगितले. यावेळी प्रस्तावित मराठी भाषा भवनाचे सादरीकरण करण्यात आले.

कामा रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी १५ एप्रिलपासून २४ तास सोनोग्राफी सुविधा

बैठकीस मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख, सदस्य सर्वश्री सयाजी शिंदे, अनंत देशपांडे, डॉ.प्रकाश परब, डॉ.पृथ्वीराज तौर, पी.विठ्ठल, प्रकाश होळकर, जयंत येलुलकर, डॉ.राजीव यशवंते, डॉ.वंदना महाजन, डॉ.अनुपमा उजागरे, श्रीमती जयश्री देसाई आदी सदस्य तसेच भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे आदी प्रत्यक्ष तर श्रीपाद जोशी, डॉ.गणेश चंदनशिवे, पं.विद्यासागर, मिलिंद जोशी, श्री.वरखेडे, श्रीमती अनुराधा मोहनी आदी सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.