राज्यातील काही भागात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण

तापमानाही वाढ, थंडी गायब

मुंबई दि.०५ :- बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि दक्षिणेकडील काही भागांत पावसाची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रातील काही भागांत पुढील तीन‌ ते पाच दिवस ढगाळ हवामान राहील, असा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या भागातून उत्तरेकडे वारे वाहत असून काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. परिणामी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यताही वेधशाळेने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.