ठळक बातम्या

मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा

पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे

मुंबई दि.०३ :- उज्वल भारताचे स्वप्न साकार करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी स्त्रीशक्ती आत्मनिर्भर होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महिला विद्यापीठ तसेच महिला महाविद्यालयांनी विद्यार्थिनींना कौशल्य प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

एसएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विलेपार्ले येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयाच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी संस्थेच्या सभागृहात साजरा झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. माजी मंत्री अमरीश पटेल, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव, प्रकुलगुरु रुबी ओझा, मुंबई पोस्टल विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हिमाद्री नानावटी, प्राचार्या डॉ राजश्री त्रिवेदी, विश्वस्त अपूर्व नानावटी तसेच

महाविद्यालयाचे शुभचिंतक, माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक उपस्थित होते. पालघर व चंद्रपूर येथे महिला विद्यापीठाची उपकेंद्रे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नामुळे सुरु झालेले एसएनडीटी महिला विद्यापीठ केवळ पाच मुलींसह सुरु झाले व आज त्याचा ७ राज्यांमध्ये विस्तार झाला आहे. महिला विद्यापीठ लवकरच पालघर व चंद्रपूर याठिकाणी आपली उपकेंद्रे सुरु करणार असल्याची माहिती कुलगुरु उज्वला चक्रदेव यांनी यावेळी दिली. यावेळी डाक विभागातर्फे महाविद्यालयावर विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *