भारतीय आयुर्विमा महामंडळाची व्हाट्सअप सेवा
मुंबई दि.०५ :- भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) पॉलिसी धारकांसाठी व्हाट्सअप सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे पॉलिसीधारकांना घरबसल्या ११ विविध प्रकारच्या सेवांची माहिती मिळणार आहे.
या सेवेसाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार असून ही नोंदणी करताना पॉलिसी क्रमांक आणि अन्य आवश्यक तपशील द्यावा लागणार आहे.
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पॉलिसीधारक व्हाट्सअप सेवेचा लाभ घेऊ शकतील. संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर पॉलिसीधारकांना ८९७६८६२०९० या क्रमांकावर hi असा संदेश पाठविल्यानंतर ही सेवा उपलब्ध होणार आहे.