देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.२२ :- तरुण वर्ग या देशाची सर्वात मोठी ताकद असून देशाच्या उभारणीमध्ये त्यांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. देशाच्या विकासामध्ये तरुणांचा हातभार लागावा यासाठी रोजगार मेळाव्याची मदत होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. केंद्र सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मोदी यांनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला.

शिक्षक, प्राध्यापक, परिचारिका, डॉक्टर, औषध व्यावसायिक, अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली.
बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने ‘रोजगार मेळावा’ या नावाने हा उपक्रम सुरू केला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारकडून ७५ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती. या सर्व नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक नियुक्त्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.