गोव्यातील आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात आठ मराठी चित्रपट
मुंबई दि.२२ :- गोवा येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आठ मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. इंडियन अनुरामा या विभागाअंतर्गत दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये विक्रम पटवर्धन दिग्दर्शित ‘फ्रेम, डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ आणि दिक्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या चित्रपटांचा समावेश आहे.
उत्तम व्यावसायिक यश या विभागात प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे तसेच महोत्सवाच्या ‘फील्म मार्केट’ या विभागात महाराष्ट्र शासनातर्फे ‘पोटरा’, ‘तिचं शहर होणं’, ‘पल्याड’ आणि ‘राख’ हे चार मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.
५३ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले.