‘सीआयएसएफ’च्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात १ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक
मुंबई दि.२७ :- शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरात आता सुरक्षेसाठी ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी एल्गार पुकारला असून येत्या १ मे पासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे.
अंबरनाथ येथील ‘आपला दवाखाना’ १ मेपासून सुरू होणार
‘सीआयएसएफ’ची सुरक्षा आल्यास ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, या साठी ‘सीआयएसएफ’ सुरक्षेविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सध्या संस्थानचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यातच, आता ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा व्यवस्था येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करता येणार
ग्रामस्थांनी सर्व पक्षीयांसह बुधवारी बैठक झाली. या बैठकीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. परंतु, शिर्डी बंद असल्याने वाहतुकीसह अन्य सुविधांपासून भक्तांना वंचित राहावं लागू शकते.