अंबरनाथ येथील ‘आपला दवाखाना’ १ मेपासून सुरू होणार
अंबरनाथ दि.२७ :- राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंबरनाथ येथे येत्या १ मेपासून ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे. शहरातील पूर्व आणि पश्चिम भागात प्रत्येकी दोन असे चार दवाखाने सुरू होणार असून नागरिकांना मोफत उपचार आणि विविध आरोग्य सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.
लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करता येणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य नियंत्रण प्रणालीद्वारे या दवाखान्यांचे उदघाटन होणार आहे. बृहन्मुंबई महापालिका आणि उपनगरक्षेत्रांमध्ये गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर या दवाखान्यांची व्याप्ती वाढवण्याचे निश्चित केले आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा महाराष्ट्र दिनी व्हावी – अजित पवार
त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच अंबरनाथ येथे हे दवाखाने सुरू होणार आहेत. अंबरनाथ पूर्व भागातील राहुल नगर, ठाकूर पाडा, तसेच अंबरनाथ पश्चिम भागातील भास्कर नगर परिसरातील बहुउद्देशीय समाज मंदिर आणि महाराष्ट्र गृहनिर्माण बोर्डात शिवनगर येथे सुरू करण्यात येणार आहेत.