लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करता येणार
डोंबिवली दि.२७ :- लोढा पलावा चौक ते निळजे रेल्वे स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सम, विषम तारखेला वाहन चालकांना वाहने उभी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा महाराष्ट्र दिनी व्हावी – अजित पवार
शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा गृहसंकुल, २७ गावे परिसरातील बहुतांशी नोकरदार वर्ग निळजे रेल्वे स्थानकातून मुंबई, पनवेल दिशेने जातो. हे नोकरदार आपल्या दुचाकी वाहनाने रेल्वे स्थानक भागात येतात आणि रस्त्यावर वाहने उभी करतात.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर विचित्र अपघातात ११ वाहने एकमेकांना धडकली, जीवितहानी नाही
रेल्वे स्थानक परिसरात ही वाहने उभी करुन ठेवल्याने तसेच काही अवजड वाहने या भागात आल्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी वरील उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे.