बृहन्मुंबई महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती

रिपब्लिकन पक्षाचा ठराव मंजूर

मुंबई दि.०३ :- आगामी बृहन्मुंबई महापालिका निवडणूक आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत महायुती करून लढण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाने घेतला आहे.

हेही वाचा :- विस्तारीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी युद्ध पातळीवर कार्यवाही करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात रिपब्लिकन पक्षाच्या राज्य समितीची बैठक शुक्रवारी पार पडली.‌या बैठकीत उपरोक्त ठराव मंजूर करण्यात आला, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. रिपाइं च्या राज्य समितीच्या वैठकीत आठवले यांनी कार्यकर्त्याना आगामी  विधानसभेच्या निवडणुकीची  तयारी करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा :- ‘जी २० परिषदे’ च्या महाराष्ट्रात १४ बैठका होणार

प्रत्येक जिल्ह्यात  रिपब्लिकन पक्षाचे किमान दोन हजार क्रियाशील सदस्य बनवावेत. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात रिपब्लिकन पक्षाचे  किमान एक ते दोन हजार क्रियाशिल सदस्य बनवा अन्यथा रिपाइं च्या जिल्हा आणि तालुका समितीला  मान्यता देणार नाही. असा इशाराही आठवले यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.