स्वतंत्र अपंग मंत्रालयासाठी १ हजार १४३ कोटीची तरतूद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई, दि. ३ जागतिक अपंग दिनाच्या शनिमित्ताने राज्यामध्ये स्वतंत्र अपंग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे केली. त्यासाठी २ हजार ०६३ पदांची निर्मिती करण्यात आली असून १ हजार १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
सैनिक कल्याण विभागाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार बच्चू कडू,यामिनी जाधव,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
यावेळी मुखमंत्र्यांच्या हस्ते विविध क्षेत्रामध्ये कार्य करण्याऱ्या अपंग बांधवांचा सत्कार करण्यात आला. एका दिनदर्शिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वच्छ, सुंदर ठाण्यासाठी सर्वांनी काम करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
या स्वतंत्र मंत्रालयासाठी सचिव दर्जाचे अधिकारी असतील. अपंग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे मंत्रालय करेल. अपंगांच्या मागण्यांबाबतच्या आंदोलनात अपंगांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी गृह विभागाला सूचना करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी महापालिकेतर्फे विविध सेवा-सुविधा
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे केले. सहसचिव दिनेश डिंगळे यांनी आभार मानले.
——–