राज्यात वन्यजीव व्यवस्थापनाचे काम अभिनंदनीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबई दि.०३ :- राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षामध्ये पार पडली. वनमंत्री सुधीर मुगंटीवार नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
कडोंमपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकांमांबाबत धोरण निश्चित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मुल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये असल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मुल्यांकन केले जाते.
निर्णयाचा पुनर्विचार करायला दोन ते तीन दिवसांचा वेळ द्यावा- शरद पवार
२०२२ मध्ये झालेल्या या मुल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मुल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.