पदपथावरील अतिक्रमणे हटवून ते चालण्यायोग्य करा
मुंबई उच्च न्यायालयाचे बृहन्मुंबई महापालिकेला आदेश
मुंबई दि.०७ :- मुंबईच्या पदपथावरील अतिक्रमणे हटवून हे पदपथ वयोवृद्ध तसेच अपंगांसह सर्वसामान्य पादचाऱ्यांना चालण्यायोग्य करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा बृहन्मुंबई महापालिकेला दिले.
मुंबई सागरी किनारा मार्गाला लता मंगेशकर यांचे नाव नको!
पदपथावरील अतिक्रमणामागील कारणे आणि ते रोखण्यासाठीच्या ठोस उपाययोजनांबाबत महापालिकेला येत्या १ मार्चपर्यंत सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे, असेही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला सांगितले.
स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौकेवर ‘तेजस’ लढाऊ विमानाची चाचणी यशस्वी
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. तेव्हा हे आदेश देण्यात आले.