रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई, दि. १४ – देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या (रविवार) रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर दुपारी १ ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे ते कल्याण पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळविण्यायात येणार आहेत.
नवरात्रोत्सवास उद्यापासून सुरुवात; महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर
हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सकाळी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
नवरात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू राहणार
सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/गोरेगाव आणि १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत गोरेगाव/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.