राजकीय

पराभव दिसू लागल्याने भाजपकडून दडपशाहीने पक्ष फोडण्याचे काम- नाना पटोल

मुंबई, दि. ६
भारतीय जनता पक्षाला पराभवाची भिती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची भिती दाखवून विरोधी पक्ष संपविण्याचे गलिच्छ राजकारण सुरु आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज येथे केले.

राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला? -अजित पवार यांचा शरद पवार यांना बोचरा सवाल

काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे इत्यादी नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती -प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

बैठकीनंतर पत्रकारांशी पटोले बोलत होते.
भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपविण्याचा संकल्प आजच्या बैठकीत करण्यात आला तसेच . या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावरही चर्चा करण्यात आली असल्याचे पटोले म्हणाले.‌

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला अजित पवार आणि अन्य आमदारांची साथ- चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे, असे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
———-

लक्ष्मणराव इनामदार यांचे जीवन अलौकिक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *