अपंग व्यक्तींना सहानुभूती नको तर सहकार्य मिळणे गरजेचे- राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.२६ :- अपंग व्यक्तींना सहानुभूती नको तर समाजाकडून सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, हेतू चॅरिटेबल ट्रस्ट, जिल्हा न्यायिक सेवा प्राधिकरण – मुंबई उपनगर आणि ‘सक्षम’ कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ७५ अपंग गरजू व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने शिवण यंत्र, पिठाची चक्की राजभवन येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. त्यावेळी राज्यपाल बैस बोलत होते.
काश्मीरमधील महिला सबलीकरणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- पंकजा दीदी
भारतात सुमारे दोन टक्के लोक अपंग आहेत. अपंगांना शिक्षण, रोजगार प्रशिक्षण, सामान संधी आणि सुरक्षित वातावरण देणे समाजाचे कर्तव्य आहे. अनुकूल वातावरण मिळाल्यास अपंग व्यक्तही उत्कृष्ट कार्य करू शकतात, असेही राज्यपालांनी सांगितले. अपंग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी कार्य करणाऱ्या हेतू चॅरिटेबल ट्रस्टला राज्यपालांनी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
