ठळक बातम्या

गुजरात येथून आलेल्या स्वच्छता यात्रेकडून बृहन्मुंबई महापालिकेच्या कामांचे कौतुक

मुंबई दि.१६ :- बृहन्मुंबई महापालिकेने केलेले स्वच्छता विषयक कार्य, लोकसहभागातून कचऱ्यापासून खत निर्मिती, कचरा वर्गीकरण, आणि वस्तीतील अत्यंत चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये राखलेली स्वच्छता, जपलेली पर्यावरण पूरकता आणि सुशोभिकरण यांचे कौतुक आज गुजरात येथून आलेल्या प्रतिनिधींनी केले. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘स्वच्छता यात्रा’ आज मुंबईत आली. मुंबईत आलेल्या यात्रेतील सर्व गुजराती महिला प्रतिनिधींनी मराठी भाषेतून स्वच्छतेची शपथ घेतली आणि मुंबईतील कामांच्या धर्तीवर गुजरातमध्ये देखील काम उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला.

अपंग व्यक्तींना सहानुभूती नको तर सहकार्य मिळणे गरजेचे- राज्यपाल रमेश बैस

महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत मुंबईतील विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे पाहून प्रभावित झालेल्या या प्रतिनिधींनी मुंबईतील कार्यकर्त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरवही केला. बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे विशेष कार्य अधिकारी तथा महाराष्ट्र स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी, गुजरात राज्यातील स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापक जिग्नेश पटेल, गुजरातच्या प्रकल्प व्यवस्थापक भावना मिश्रा, गुजरात राज्यातून आलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या व बचत गटांच्या महिला प्रतिनिधी आदि यावेळी उपस्थित होते.

काश्मीरमधील महिला सबलीकरणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे- पंकजा दीदी

स्वच्छता यात्रेची सुरुवात अंधेरी पश्चिम परिसरातील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था येथून झाली. त्यानंतर स्वच्छता यात्रेने ‘आर दक्षिण’ विभागाच्या कार्यक्षेत्रातील कांदिवली पश्चिम परिसरात असणाऱ्या रगडापाडा परिसराला भेट दिली. अंधेरी पश्चिम परिसरातील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड नजीक असणाऱ्या ‘ग्रीनफिल्ड रॉक्स एंड’ या ४१२ सदनिका असणाऱ्या व सुमारे दीड हजार रहिवाशी असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेत उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाला स्वच्छता यात्रेतील प्रतिनिधींनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *