महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई दि.०१ :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

‘ द रॅशनलिस्ट मर्डर्स’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला सशस्त्र पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस डाळ, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज व मुंबई अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज यांच्या निशाण टोळ्या, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले.

मरीन ड्राईव्ह परिसरात पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा द्याव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची ४ महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती. यंदाच्या कार्यक्रमात प्रथमच, राज्य शासनाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १० उमेदवारांना राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश व शिफारस पत्रे देण्यात आली. भूमी अभिलेख, राज्य उत्पादन शुल्क परिवहन विभाग आदी विभागांमध्ये त्यांची निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांनी करीयरच्या वाटा निवडताना भविष्यातील संधींचा विचार करावा – गिरीश टिळक

महानगर पालिकेतर्फे राज्य स्थापना दिन साजरा मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे क्रीडाभवन येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमाला उपस्थित राहून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ऐकला. यावेळी महाराष्ट्र गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या संगीत कला अकादमीला पंचेवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.