शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात स्वतंत्र बालक्षयरोग उपचार कक्ष सुरू होणार

मुंबई दि.१३ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय परिसरात वय वर्षे ३ ते १२ दरम्यानच्या क्षयरोगबाधित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र बालक्षयरोग कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या क्षयरोगबाधित रूग्णांना एकाच छताखाली उपचार मिळावेत, या उद्देशाने या बालक्षयरोग कक्षाची सुरूवात करण्यात येणार आहे.

म्हाडा कोकण मंडळाच्या २ हजार ४३५ घरांना प्रतिसाद नाही

याबरोबरच क्षयरोग रुग्णालयातील आरोग्य सुविधांना देखील बळ देण्यात येणार आहे. यासाठी दोन तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार अर्थात ‘बालरोग तज्ञ’ (SMC Pediatrics) यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना राज्य शासनाचा दिलासा; आरोप आणि निलंबन मागे
या प्रस्तावित कक्षामध्ये २० रूग्णशय्या असणार आहेत. यामध्ये १० खाटा या औषधरोधी क्षयरोगाची बाधा झालेल्या बाल रूग्णांसाठी तर १० रूग्णशय्या औषधसंवेदीत बाल रुग्णांसाठी असल्याचेही डॉ. गोमरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.