Thursday, August 20, 2026
Latest:
सामाजिक

डोंबिवलीत भाजपच्या वतीने NCMC स्मार्ट कार्ड शिबिराचे आयोजन; प्रवाशांना मिळणार विविध सवलतींचा लाभ!

डोंबिवली:
भारतीय जनता पार्टी (डोंबिवली) च्या वतीने आणि भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सोयीसाठी शासकीय NCMC स्मार्ट कार्ड शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका सौ. सायलीताई संजय विचारे यांच्या नेतृत्वात हे शिबीर पार पडणार आहे.

या NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डमुळे नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC/एसटी) सर्व बसेस तसेच मेट्रोमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

शिबिराचे सविस्तर नियोजन:

दिनांक: रविवार, १६ ऑगस्ट २०२६ ते सोमवार, १७ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत
ठिकाण: नगरसेविका सौ. सायली संजय विचारे यांचे कार्यालय, महाजन चाळ, शॉप नंबर ७, पाथर्ली रोड, डोंबिवली (पूर्व).

बांकीपूर पोट निवडणूक निकाल : बिहारच्या राजकारणात नवा विरोधी पक्ष

या योजनेचे मुख्य फायदे व सवलती:

अमृत ज्येष्ठ नागरिक (६५ महिला / ७५ वर्षांवरील नागरिक): मोफत प्रवास.

ज्येष्ठ नागरिक (६५ वर्षांवरील): प्रवासात ५०% सवलत.

महिला व मुली (वय १० ते ६५ वयोगट): प्रवासात ५०% सवलत.

कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अटी:

आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड आणि मोबाईल नंबर. (आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसला तरीही चालेल)

महत्त्वाची अट: बायोमेट्रिक (अंगठा व फिंगर स्कॅन) प्रक्रियेसाठी ज्या लाभार्थ्याला कार्ड काढायचे आहे, त्यांनी स्वतः समक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

भाजप कल्याण जिल्ह्याची संघटनात्मक बांधणी मजबूत; ६ प्रभागांसाठी ‘प्रभाग प्रभारी’ जाहीर

कार्ड शुल्क: NCMC कार्डची मूळ किंमत ₹ २३०/- आहे.

डोंबिवलीतील जास्तीत जास्त नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका सौ. सायलीताई संजय विचारे (प्रभाग क्र. २७ ब) यांच्या वतीने करण्यात आले आहे.